Friday, July 31, 2009

आकलन

एक नवीन कविता वाचली आज ......so here it is....


नव्या कोऱ्या अनाघ्रात
ओंजळीत फुलांसारख्या
पुढे केल्या कविता

कठिण वगैरे वाटल्या तुला
मला जे म्हणायचे
ते मध्येच भरकटले
पोहोचलं नाही तुझ्यापर्यंत

"काहीतरी सोपे लिहीत जा ना.....उगाच गूढ़ काहीतरी..."

थोडी हिरमुसले , तरी हसलेच !!
प्रथमदर्शनी दुरूह वाटल्या तरी

हळू हळू उकलतील
एक एक ओळ
एक एक अन्तरा
शब्द न शब्द
स्थिरावेल तुझ्या ओठात
आशय घर करतील
अक्षय घट भरतील मनात

इतक्या वर्षा नंतर जशी अताशा
" मी "
तुला उमगते !

Thursday, July 30, 2009

अंहकार

बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात।पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात।त्याचं कारण या तिथींमध्ये शेवटी मी येतो. याच ;मी;पणाच्या अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही,सा समज आहे.कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, पण तो भावही देत नाही.तू तर एवढी साधी;पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो.तू अशी काय जादू केलीस? बासरी म्हणाली, ;तुम्ही माझ्यासारख्या व्हा,तो तुम्हालाही जवळ घेईल.;अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं.;मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ, ना एखादं वळण. मी पोकळ आहे. त्या पोकळीतून माझ्यातला अहंकार गळून पडलाय.माझ्या अंगावरच्या सहा भोकांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले.मला स्वत:चा आवाजही नाही.तो जशी फुंकर मारतो तशी मी बोलते. गोपी निरुत्तर झाल्या.तेव्हापासून त्या बासरीवर रुसून आहेत.म्हणूनच असेल कदाचित, पण आज आपल्याकडे एकही स्त्री बासरीवादक नाही…!

मस्त वाटते वाचून सुपर आहे हे एकदम!!!

Monday, July 27, 2009

पुन्हा भेट!!

Huhhh

Joining n writing my blog after a very long time. Missed Ipsit alot. Now again started with bloggging blogging...hope will enjoy it। Will try to write new n interesting. भेटूच मग!!